लठ्ठपणामुळे Bharti Singh सोडलेली लग्नाची आशा, मग 3 वर्षानी लहान हर्ष लिम्बाचियाने तिच्यात काय बघून केलं प्रपोज?

Image

Bharti Singh Haarsh Limbachiyaa Love Story : भारती सिंह ही आजही भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन पैकी एक म्हणून ओळखली जाते. आजही तिची कॉमेडी रडणाऱ्या माणसालाही सहज हसवू शकते इतकी निखळ आणि निरागस आहे. पण तिची ओळख केवळ तिच्या कॉमेडी मुळेच नाही तर तिच्या लव्हस्टोरी मुळे आहे. ती आणि तिचा पती खरंच खूप लकी आहे ज्यांनी एकमेकांना त्यांचा पार्टनर म्हणून निवडले. भारतीने आपल्या कष्टाने आणि मेहनतीने कॉमेडीच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण तिच्या यशामागे हर्ष लिम्बाचियाचा महत्त्वाचा हात आहे.हर्ष, जो एक प्रतिभावान लेखक आहे, त्याने भारतीच्या जीवनात केवळ प्रेमच नाही, तर आधार, विश्वासही आणला. त्यांची प्रेमकथा एका साध्या मैत्रीपासून सुरू झाली आणि आज ते एक आयडियल कपल म्हणून ओळखले जातात. भारती आणि हर्षने एकमेकांना इतके चांगले ओळखतात की त्यामुळे त्यांचे नाते आणखीनच मजबूत झाले आहे. चला, जाणून घेऊया की त्यांची ओळख कशी झाली, ते कसे प्रेमात पडले, आणि एकमेकांना त्यांनी कशी साथ दिली! (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम - bharti.laughterqueen, haarshlimbachiyaa30)

Happy Birthday Bharti Singh : आपण लठ्ठ आहोत आपल्या प्रेमात कोण पडणार? आपल्यासारख्या रंग रूप नसणा-या मुलीशी कोण लग्न करणार? असं म्हणत कॉमेडी क्वीन इतकी प्रसिद्ध असूनही भारती सिंगने सोडलेली लग्नाची आशाच पण इतक्यात हर्षने आयुष्यात एंट्री मारली अन् सारंच पालटलं.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!