विद्युत करंट लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा जिल्हा परिषद शाळेत मृत्यु; भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दुर्देवी घटना

Image

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर (Lakhandur) तालुक्यातील पुयार येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका सहा वर्षीय चिमूकलीला विद्युत करंट लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आज 3 जुलैच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडलीय. यशस्वी सोपान राऊत (वय 6 वर्ष, रा.पुयार) असं या मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे.शाळेच्या तिसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली असून राऊत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.लघुशंकेसाठी गेली असता लागला विजेचा करंटविदर्भातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचं निर्देश शिक्षण विभागानं दिलं होतं. त्यानुसार सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासात विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतचं विद्युत करंट लागून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत (वय6 वर्ष रा. पुयार) असं मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे. आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली. लघुशंकेसाठी गेली असता तिला विजेचा करंट लागला आणि त्यातचं तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.हातचलाखीने उडविले महिलेचे 21 हजार रुपये, घटना सीसीटीव्हीत कैदबँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेला पाचशे रुपयांची नोट फाटली असल्याचं सांगून एका इसमानं महिलेचे 21 हजार रुपये लंपास केलेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे घडली. हा संपूर्ण घटनाक्रम बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तुमसर तालुक्यातील मांगली येथील इंदिरा गांधी महिला बचत गटची सचिव दुर्गा रोशन पुंडे यांनी पन्नास हजार रुपये काढलेत. त्यानंतर बँकेतील बाकावर बसली असता, एका इसमानं तिला बँकेतून मिळालेल्या नोटा फाटक्या असल्याची बतावणी करून हातचलाखीनं महिलेचे 21 हजार रुपये उडविले. बँकेतील सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.इतर महत्वाच्या बातम्या Bhandara News : डीजेच्या ताल, सजविलेल्या बैलगाडीचा झगमगाट, विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत; आज शाळेची पहिली घंटा वाजणार

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर (Lakhandur) तालुक्यातील पुयार येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका सहा वर्षीय चिमूकलीला विद्युत करंट लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा शाळेतच दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना आज 3 जुलैच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडलीय. यशस्वी सोपान राऊत (वय 6 वर्ष, रा.पुयार) असं या मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे.शाळेच्या तिसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र शोककळा पसरली असून राऊत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लघुशंकेसाठी गेली असता लागला विजेचा करंट विदर्भातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचं निर्देश शिक्षण विभागानं दिलं होतं. त्यानुसार सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासात विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतचं विद्युत करंट लागून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. यशस्वी सोपान राऊत (वय6 वर्ष रा. पुयार) असं मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे. आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली. लघुशंकेसाठी गेली असता तिला विजेचा करंट लागला आणि त्यातचं तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान, लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हातचलाखीने उडविले महिलेचे 21 हजार रुपये, घटना सीसीटीव्हीत कैद बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेला पाचशे रुपयांची नोट फाटली असल्याचं सांगून एका इसमानं महिलेचे 21 हजार रुपये लंपास केलेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे घडली. हा संपूर्ण घटनाक्रम बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तुमसर तालुक्यातील मांगली येथील इंदिरा गांधी महिला बचत गटची सचिव दुर्गा रोशन पुंडे यांनी पन्नास हजार रुपये काढलेत. त्यानंतर बँकेतील बाकावर बसली असता, एका इसमानं तिला बँकेतून मिळालेल्या नोटा फाटक्या असल्याची बतावणी करून हातचलाखीनं महिलेचे 21 हजार रुपये उडविले. बँकेतील सीसीटीव्ही तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. इतर महत्वाच्या बातम्या Bhandara News : डीजेच्या ताल, सजविलेल्या बैलगाडीचा झगमगाट, विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत; आज शाळेची पहिली घंटा वाजणार

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!