Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल

Image

Parliament Session 2024 Live Updates Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर दिलं. लोकसभा सभागृहात काल विरोधकांच्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं निवेदन दिलं. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि विशेषत: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तुफान हल्ला चढवला होता. काँग्रेसचा उल्लेख परजीवी करत, मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली होती. दरम्यान, 18 व्या लोकसभा सत्राला 24 जूनपासून सुरुवात . लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची नियुक्ती झाली. पीएम मोदी आज राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, 60 वर्षांनंतर तिसऱ्यांदा सरकार आले आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना म्हणजे एक असामान्य घटना आहे. काही लोक मुद्दाम तोंड फिरवून बसले होते. गेल्या दोन दिवसांपासून मी पाहत आहे की, पराभवही स्वीकारला जात आहे, दबल्या मनाने विजयही स्वीकारला जात आहे.मी आमच्या काही काँग्रेस सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो की जेव्हापासून निकाल आला तेव्हापासून, मी एका सहकाऱ्याच्या बाजूने पाहत आलो आहे. त्यांचा पक्ष त्यांना साथ देत नव्हता, तरीही तो एकटाच झेंडा घेऊन धावत होता. आमच्या सरकारला 10 वर्षे झाली, अजून 20 वर्षे बाकी आहेत. आमच्या सरकारचा एक तृतीयांश पूर्ण झाला आहे, दोन तृतीयांश बाकी आहेत.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!