भाऊबंदकीचा वाद, पिता-पुत्राला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अॅक्शन, मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

Image

Latur Crime News: लातूर : भाऊबंदकीच्या वादाबाबत अनेकदा आपण पाहिलंय, ऐकलंय. अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन अनुचित प्रकार घडल्याचंही आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार लातुरात (Latur News) घडला आहे. भाऊबंदकीतला शेतीचा वाद हा अनेकदा जीवघेणा होत असतो. अशाच शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील (Latur District) तगरखेडा येथे ही घटना घडली असून यामुळे खळबळ पसरली आहे. लातूर (Latur Latest News Updates) जिल्ह्यातील तगरखेडा येथे शेतीच्या वादावरून वडील आणि मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तगरखेडा येथे शेतीच्या वादावरुन एकाला लोखंडी रॉडच्या सहाय्यानं बेगम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.लातुरात राहणाऱ्या प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता पुत्र शेतात गेले होते. दोघांनीही शेतात प्रवेश का केला? यावरुन सिद्धार्थ लंगडे आणि शेखर लंगडे यांच्यासोबत मोठा वादा झाला. या वादाचं रुपांत भांडणात झालं ते थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता-पुत्रांना इतर पाच जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेत पाचजणां विरोधात औरद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latur Crime News: लातूर : भाऊबंदकीच्या वादाबाबत अनेकदा आपण पाहिलंय, ऐकलंय. अनेकदा हे वाद विकोपाला जाऊन अनुचित प्रकार घडल्याचंही आपण पाहतो. असाच काहीसा प्रकार लातुरात (Latur News) घडला आहे. भाऊबंदकीतला शेतीचा वाद हा अनेकदा जीवघेणा होत असतो. अशाच शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील (Latur District) तगरखेडा येथे ही घटना घडली असून यामुळे खळबळ पसरली आहे. लातूर (Latur Latest News Updates) जिल्ह्यातील तगरखेडा येथे शेतीच्या वादावरून वडील आणि मुलाला जबर मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तगरखेडा येथे शेतीच्या वादावरुन एकाला लोखंडी रॉडच्या सहाय्यानं बेगम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. लातुरात राहणाऱ्या प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता पुत्र शेतात गेले होते. दोघांनीही शेतात प्रवेश का केला? यावरुन सिद्धार्थ लंगडे आणि शेखर लंगडे यांच्यासोबत मोठा वादा झाला. या वादाचं रुपांत भांडणात झालं ते थेट हाणामारीपर्यंत पोहोचलं. प्रकाश लंगडे आणि प्रथमेश लंगडे या पिता-पुत्रांना इतर पाच जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेत पाचजणां विरोधात औरद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!