मनाला शांतता हवी आहे तर या ठिकाणाला नक्की भेट द्या, 3 दिवसात तणाव गायब

Image

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीला वैतालगला आहात. जर तुम्हाला तुमच्या मनाला शांतता हवी असेल. तुम्हाला तर तणाव डिटॉक्स करायचा असेल तर तुम्ही एका ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता. यासाठी फक्त तुम्हाला तीन दिवस द्यायचे आहेत. येथील शांतता तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल.

गौतम बुद्धांचे हे शहर शांततेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ही जागा खूप खास आहे. विशेषत: त्या लोकांसाठी ज्यांना मानसिकदृष्ट्या डिटॉक्स करायचे आहे. तुम्ही मानसिकरित्या थकले असाल किंवा तुम्हाला शांततेची गरज आहे तर तुम्ही तुम्ही या जागेला नक्की भेट दिली पाहिजे. मानसिकदृष्ट्या ही जागा तुम्हाला शांत करते. कारण इथे तुम्ही स्वतःला निसर्गाची जोडता. आयुष्यातील प्रत्येक तणाव तुम्ही काही काळासाठी दूर करु शकतात. या ठिकाणी तुम्हाला भेट देण्यासाठी बरंच काही आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या या व्यस्त जीवनातून काही वेळ काढून इथे नक्की आले पाहिजे. येथे जर तुम्हाला भेट द्यायची आहे तर तुम्ही ३ दिवसांची सुट्टी काढली पाहिजे. चला आज या जागेबद्दल जाणून घेऊयात. बोधगया हे जगातील सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. येथेच एका वटवृक्षाखाली गौतम यांनी परम ज्ञान मिळवले आणि ते बुद्ध झाले. हा सामान्य मुलगा नंतर गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जग आनंदित होऊ लागले. तेव्हापासून जगभरातील लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. महाबोधी मंदिर या ठिकाणी असलेले महाबोधी मंदिर हे सम्राट अशोका यांनी बांधले आहे. हे एक बौद्ध मंदिर आहे. जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. मंदिराच्या जवळच मुचलिंद सरोवर आहे. जेथे तुम्ही भेट देऊ शकता. येथील आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आहे. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होऊ शकते. बोधी वृक्ष बोधी वृक्ष एक पिंपळाचे वृक्ष आहे. ज्याच्या खाली बसून भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते. हृदयाला आनंद देणारे हे झाड पाहण्यासाठी आजही लोकं येथे जगभरातून येत असतात. याच्या आजूबाजूला खूप शांतता आहे जी तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवताना मनाला विश्रांती देते. ग्रेट बुद्ध मंदिर ग्रेट बुद्ध मंदिर देखील खूपच खास आहे. या मंदिरात भगवान बुद्धांची मोठी मूर्ती आहे. मंदिराच्या आजूबाजूला शांत आणि आनंदी करणारे वातावरण आहे. संपूर्ण क्षेत्र तत्त्वज्ञान आणि ध्यानाच्या अभ्यासासाठी एक शांत आश्रयस्थान आहे. हे भारतातील बोधगया येथे स्थित असलेले तिबेटी परंपरेतील एक बौद्ध केंद्र आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!