Car Sales In June : मारुती, टाटा, किआ...जूनमध्ये कुठल्या कंपनीने विकल्या किती कार्स? इथे जाणून घ्या.....

Image

Car Sales In June : ऑटोमोबाइल कंपनीने जून 2024 मध्ये जवळपास 3.40 लाख गाड्यांची विक्री केली. मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 3.67 टक्के वाढ झाली. जून 2023 मद्ये जवळपास 3.28 लाख वाहनांची विक्री करण्यात आली. मारुति सुजुकी, किआ, टाटा मोटर्स आणि बाकी कंपन्यांनी किती कार्स विकल्या जाणून घेऊया.

मारुती सुजुकीने डोमेस्टिक पॅसेंजर व्हीकल्सच्या सेलमध्ये 3 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने जून 2024 मध्ये 1,37,160 गाड्या विकल्या. यात छोट्या कारच्या सेलमध्ये घसरण आणि SUV/MPV कॅटेगरी कारच्या सेलमध्ये वाढ झाली आहे. हुंडई मोटर इंडिया दुसऱ्या नंबरवर आहे. कंपनीने मागच्या महिन्यात पॅसेंजर व्हीकल्सच्या 50,103 युनिट्सची विक्री केली. जून 2023 मध्ये 50,001 युनिट्सची विक्री केली होती. टाटा मोटर्स सेलच्या बाबतीत जून 2024 मध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. कंपनीने यावेळी 43,624 युनिट्सची विक्री केली. यात इलेक्ट्रिक व्हीकल्स सेल सुद्धा आहे. मागच्या महिन्यात कंपनीच्या सेलमध्ये 8 टक्के घसरण झाली. महिंद्रा अँड महिंद्राच्या सेलमध्ये जून 2024 मध्ये वाढ झाली. मागच्या महिन्यात कंपनीने 40,022 गाड्यांची विक्री केली होती. तेच होंडाने 4804 कार्स आणि टोयोटाने 27,474 गाड्यांची विक्री केली. किआने जून 2024 मध्ये 21,300 गाड्या विकून 9.8 टक्के वार्षिक ग्रोथ मिळवला. कंपनीने सर्वात जास्त सॉनेट यूनिट्सची (9,816) विक्री केली.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!