लग्न झाल्यानंतरही त्या महिला परपुरुषांकडे का होतात आकर्षित?; चाणक्यनीतीत उत्तर काय?

Image

भारत हा धार्मिक लोकांचा देश आहे. धार्मिक उपदेश आणि नीतीला मानणाऱ्यांचा हा देश आहे. देशात आर्य चाणक्यांची नीती ही नीतीमूल्यांवर आधारीत आहे. त्यामुळे ही नीती मानणारा वर्ग मोठा आहे. आर्य चाणक्यांनी गृहस्थी जीवनावरही भाष्य केलं आहे. पती-पत्नीतील सुसंवाद आणि त्यांच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.

आचार्य चाणक्यांची नीती आजही लागू पडते. अनेकजण त्यांच्या शिकवणुकीचा अवलंब करतात. जगात कसे वागावे? काय करावे? आणि काय करू नये हे चाणक्य सांगत असतात. जगभरात या नीतीचा अवलंब केला जातो. चाणक्य नीतीत लोकांच्या स्वभावावरही भाष्य केलेलं असतं. कौटुंबिक गोष्टींवरही चाणक्य नीती भाष्य करते. तसेच माणसाने कसं वागावं याचं मार्गदर्शनही चाणक्य नीतीतून होते. केवळ भाष्य करूनच चाणक्य थांबत नाहीत तर त्यावर उपायही सूचवत असतात. आर्य चाणक्यांनी महिलांबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. लग्न झालेल्या महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात. त्याचा उल्लेखही चाणक्य नीतीत आहे. त्यावर भाष्यही करण्यात आलं आहे. तसेच आयुष्यात लग्नाचं महत्त्व किती आहे, याची माहितीही आर्य चाणक्य देतात. जेव्हा पत्नी नवऱ्यापासून संतुष्ट असते तेव्हा ती फार कमी बोलते. याचा अर्थ हा नाही की तिला बोलायला आवडत नाही. ती नवऱ्यापासून खूश असल्याचे संकेत देते हा त्याचा अर्थ होतो, असं चाणक्य म्हणतात. या उलट पुरुषांच्या बाबतीत होतं. जेव्हा पुरुष अबोल राहतो, तेव्हा पत्नी अस्वस्थ होते. नवरा जेव्हा तिला टाळू लागतो, तेव्हा तिचा मोहभंग होतो आणि त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. अशावेळी त्यांना पत्नीची प्रत्येक गोष्ट मानणारा परपुरुष खूप चांगला असल्याचं वाटू लागतं. त्यामुळेच दाम्पत्याने अशा प्रसंगी आपल्यातील गोष्टी उघड करून त्या दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजे, असं चाणक्य नीती सांगते. चाणक्यांच्या मते, कधी कधी पती-पत्नीत वाद होणं हे स्वाभाविक आहे. पण हे वाद वारंवार होत असतील तर चिंतेचा विषय आहे. जेव्हा पत्नी प्रत्येक छोट्या गोष्टींमुळे संतापत असेल तर तिच्या मनात असंतोष खदखदत आहे, हे समजून जा. अशावेळी पतीने पत्नीचा स्वभाव समजून घेतला पाहिजे. तसेच संवेदनशीलतेने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही दाम्पत्य जीवनात जबाबदाऱ्यांचं मोठं योगदान असतं. जेव्हा दोन्ही पार्टनर एकत्रितपणे घराचे निर्णय घेत असेल आणि मुलांचं संगोपण करत असेल तर त्यांच्यातील सामंजस्य मजबूत असलं पाहिजे. अशा प्रकारे चाणक्य नीतीत समग्र विकासासाठी पारंपारिक सहयोगाला महत्त्व दिलं आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!