विधानसभा निवडणुकीत मतदान करायचंय ना, मग लगेच ‘या’ संकेतस्थळावरून नोंदवा मतदार यादीत नाव; अंतिम यादी 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार; प्रारूप यादी नीट पहा, अन्यथा...

Image

विधानसभा निवडणुकीत मतदान करायचंय ना, मग लगेच ‘या’ संकेतस्थळावरून नोंदवा मतदार यादीत नाव; अंतिम यादी 20 ऑगस्टला प्रसिद्ध होणार; प्रारूप यादी नीट पहा, अन्यथा...

सोलापूर : ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत मतदान करायचे असल्यास ज्यांना १ जुलैला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदविणे जरुरी आहे. दुसरीकडे २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून त्यावेळी ज्या मतदारांच्या नावात दुरुस्ती किंवा हयात असताना मयत दाखविले किंवा नाव नोंदवूनही यादीत नाव नाही, अशांना हरकत घेऊन यादीत समाविष्ट होण्याची संधी मिळणार आहे. दरवर्षी मतदार नोंदणी सुरूच असते, १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर या काळात निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची संधी मतदारांना असते. आता विधानसभेनंतर जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समित्या, नगरपालिकांची निवडणूक होईल. त्यावेळी विधानसभेचीच मतदार यादी ग्राह्य धरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच नाव नोंदविल्यास त्या मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदान करण्याची संधी मिळणार आहे. पण, अद्याप कोणती मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी ग्राह्य धरली जाणार हे निश्चित झालेले नाही. दुसरीकडे ज्या मतदारांची चुकून स्थलांतर म्हणून, मयत म्हणून किंवा नावात त्रुटी आहेत, त्यांनी निश्चितपणे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर हरकती घेऊन त्यात दुरुस्ती केली तरच त्यांना विधानसभेला मतदान करता येणार आहे. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी नीट पहा, अन्यथा... लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. साडेपाच हजार बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी जावून मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती, दुबार नावे काढून टाकण्याची मोहीम सुरू आहे. २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असून त्यावेळी ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत किंवा हयात असतानाही मयत असल्याची नोंद आहे, नावातील बदलाची दुरुस्ती झालेली नाही, त्यांनी त्यावर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. नाहीतर लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मतदान करता येणार नाही. ‘या’ संकेतस्थळावर करा मतदान नोंदणी १ जुलैला ज्या मतदाराला १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार यादीत नाव नोंदवून विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांना voters.eci.gov.in आणि voter helpline app या ठिकाणी नाव नोंदविता येणार आहे. नोंदणी केली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या मतदार नोंदणी सुरू आहे. १ जुलै २०२४ रोजी ज्यांना १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्यासह ज्यांनी आजवर मतदार म्हणून नोंदणी केली नाही त्यांनी नाव नोंदणी करावी. २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. - गणेश निऱ्हाळी , उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!