रथातून आलेल्या नवरीपेक्षा उठून दिसली सासूबाईच, मामेरू समारंभात पिंक ऑरेंज लेहंग्यात नीता अंबानींनी चोरलं काळीज

Image

अनंत आणि राधिकाचे लग्न आता अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरात विविध रितीभातींची लगभग दिसून येत आहे. लग्नाआधीचे अनेक कार्यक्रम अँटेलियावर पार पडत आहेत. ज्यामध्ये अनेक मोठमोठे पाहुणेही दिसून येत आहेत. काल रात्री म्हणजेच 3 जुलै 2024 रोजी अंबानींच्या बंगल्यावर “मामेरू” नावाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी अंबानी कुटुंबासोबतच राजकीय क्षेत्रातील आणि बॉलीवूडमधील काही मोठे चेहरे सजूनधजून दिसून आले. ‘मामेरू’ ज्याला ‘मोसालू’ असेही म्हणतात. मामेरू म्हणजे मामा.गुजराती संस्कृतीत लग्नाच्या काही दिवस आधी साजरा केला जाणारा हा पारंपारिक सोहळा आहे. जेथे मामेरू विधीच्या वेळी वधूचे मामा त्यांच्या बहिणीच्या नव-यासोबत नवरीसाठी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन तिला भेटायला जातात. त्याचप्रमाणे नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या जोडप्याला भेटवस्तू आणि आशीर्वाद देण्यासाठी अँटिलियाला पोहोचल्या होत्या. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

अनंत आणि राधिकाचे लग्न आता अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपले आहे. घरात विविध रितीभातींची लगभग दिसून येत आहे. लग्नाआधीचे अनेक कार्यक्रम अँटेलियावर पार पडत आहेत. ज्यामध्ये अनेक मोठमोठे पाहुणेही दिसून येत आहेत. काल रात्री म्हणजेच 3 जुलै 2024 रोजी अंबानींच्या बंगल्यावर “मामेरू” नावाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी अंबानी कुटुंबासोबतच राजकीय क्षेत्रातील आणि बॉलीवूडमधील काही मोठे चेहरे सजूनधजून दिसून आले. ‘मामेरू’ ज्याला ‘मोसालू’ असेही म्हणतात. मामेरू म्हणजे मामा. गुजराती संस्कृतीत लग्नाच्या काही दिवस आधी साजरा केला जाणारा हा पारंपारिक सोहळा आहे. जेथे मामेरू विधीच्या वेळी वधूचे मामा त्यांच्या बहिणीच्या नव-यासोबत नवरीसाठी मिठाई आणि भेटवस्तू घेऊन तिला भेटायला जातात. त्याचप्रमाणे नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल या जोडप्याला भेटवस्तू आणि आशीर्वाद देण्यासाठी अँटिलियाला पोहोचल्या होत्या. (फोटो सौजन्य :- योगेन शाह) वंतारा थीमनुसार सजला स्टेज सर्वांनी समारंभासाठी पिंक आणि ऑरेंज रंगाची थीम फॉलो केली. सजावटीसाठीही त्याच रंगाची फुले वापरण्यात आली. वंतारा या थीमनुसार स्टेजची सजावट केल्यामुळे त्यात भरपूर रंगीबेरंगी फुले, पाने, हिरवळ आणि प्राण्यांचे चलचित्र दिसून येत होते. या कार्यक्रमात नीता अंबानीसोबतच ईशा आणि दोन्ही सूना श्लोका व राधिका एकदम रिच आऊटफिट्समध्ये सजलेल्या दिसून आल्या. पण नीताने आपल्या स्टाईलने सर्वांनाच टक्कर दिली. भडक पिंक लेहंग्यात सजली सासूबाई साडी आणि पारंपारिक साड्यांवर असलेल्या प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीता अंबानींनी लेकाच्या मामेरू कार्यक्रमासाठी सर्वात सुंदर व उठावदार असा पिंक ह्यूड बांधणी लेहंगा निवडला होता. इतक्या श्रीमंत असूनही आजही नीता अंबानींनी गुजराती पाळंमुळं किंवा संस्कृती जपली आहे यासाठी सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. लेहंग्याची खासियत या गुलाबी बांधणी लेहंग्याला खालील बाजूस संपूर्ण ब्रॉड गोल्डन जरी वर्क आणि मोटिफ्सची उत्कृष्ठ डिझाईन कोरलेली बॉर्डर होती ज्याने लेहंग्याचे सौंदर्य द्विगुणीत केले होते. गोल्डन बॉर्डरवर लावलेले डायमंड चमचमत होते. तर या लेहंग्यावर नीता यांनी पारंपारिकपणे गुजराती स्टाईलने ओढणी पिनअप केली होती. या सुंदर लेहंगा चोळी सेटवर त्यांनी गुलाबी, सोनेरी आणि केशरी रंगाच्या ओम्ब्रे ब्लाऊज मॅच करत लुक कमप्लिट केला होता. पाचू आणि डायमंड ज्वेलरीमध्ये सजल्या नीता हा लुक पूर्ण करण्यासाठी नीता अंबानींनी आकर्षक असा राणीसारखा गळाभर एक डायमंड नेकलेस घातला होता, ज्याच्या मधोमध एक मोठा पाचू जडलेला होता ज्याने लुकची शोभा आणखीनच वाढवली. याशिवाय त्यांनी मॅचिंग कानातले, हातात पाचूची चमचमणारी अंगठी आणि हातात दोन डायमंड कडे घालून दागिन्यांत न्हाहून निघाल्या होत्या. वरमाईचा सुंदर एलिगंट मेकअप नीता अंबानींनी आंब्रे ब्लाऊज आणि पिंक ऑरेंज लेहंग्यासोबत एकदम मॅचिंग अशी ठळक पिंक टिकली लावली होती. याशिवाय त्यांनी वेव्ही कर्ली हेअर्स मोकळे सोडले होते. मेकअपसाठी त्यांनी भरपूर प्रमाणात मस्करा आणि आयलाइनर लावले आणि न्यूड पिंक लिपस्टिकची सुंदर शेड निवडून वयाच्या 60 मध्ये सुद्धा विशीतल्या मुलींसारखी वाईब दिली.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!