भारताने घेतली दखल, इटलीला आली जाग

Image

प्रशासनाने केली कारवाई : भारतीय कामगाराच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक वृत्तसंस्था/ रोम कृषी उपकरणांमुळे हात कापून एका 31 वर्षीय भारतीय कामगाराचा इटलीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता एका शेतमालकाला मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेतमालकाने अत्यंत गंभीर जखमी झालेल्या भारतीय कामगाराकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे या कामगाराचा मृत्यू झाला होता. भारतीय कामगाराच्या मृत्यूची [...]

प्रशासनाने केली कारवाई : भारतीय कामगाराच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक वृत्तसंस्था/ रोम कृषी उपकरणांमुळे हात कापून एका 31 वर्षीय भारतीय कामगाराचा इटलीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता एका शेतमालकाला मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेतमालकाने अत्यंत गंभीर जखमी झालेल्या भारतीय कामगाराकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे या कामगाराचा मृत्यू झाला होता. भारतीय कामगाराच्या मृत्यूची दखल घेत संबंधित मुद्दा भारत सरकारने इटली सरकारसमोर उपस्थित केला होता. मागील महिन्यात रोमनजीक लाजियोमध्ये यंत्राद्वारे स्ट्रॉबेरी काढली जात असताना दुर्घटना घडली होती. संबंधित भारतीय कामगाराचा दोन दिवसांनी रोमच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांनी मंगळवारी कथित गँगमास्टर एंटोनेलो लोवाटोला भारतीयाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. कॅराबिनिएरी पोलिसांनी शेतमालक एंटोनेलो लोवाटोला अटक केली आहे. फॉरेन्सिक तपासणीत अत्याधिक रक्तस्रावामुळे भारतीयाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. भारतीय कामगाराला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता असे प्रशासनाकडून म्हटले गेले. भारतीय कामगाराचा हात नायलॉन रॅपिंग मशीनमध्ये अडकल्याने कापला गेला होता, परंतु लोवाटोने त्वरित रुग्णवाहिकेला बोलाविणे टाळले होते. भारतीय कामगाराच्या मृत्यूच्या घटनेमुळे आम्ही संतप्त आहोत. लोवटोने भारतीय कामगाराला घराबाहेर सोडण्याऐवजी रुग्णालयात दाखल केले असते तर तो आज जिवंत असता. दुर्घटना होऊ शकते, परंतु कामगारांना मदत न करणे अस्वीकारार्ह आहे, असे लाजियो येथील भारतीय समुदायाचे प्रमुख गुरमुख सिंह यांनी म्हटले आहे. भारत सरकारकडून चर्चा सतनाम सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी भारतीय अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी इटलीच्या अधिकारी लुइगी मारिया यांच्याशी चर्चा केली होती. भारतीय कामगाराच्या मृत्यूप्रकरणी भारताच्या तीव्र चिंतेची जाणीव त्यांनी करून दिली होती. तर इटलीच्या पंतप्रधान जॉयोर्जिया मेलोनी यांनी देखील सतनाम सिंह यांच्या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!