सरोवराच्या तळाशी सापडली दफनभूमी

Image

मोठमोठी थडगी पाहून तज्ञ अवाक् काही ठिकाणी आपण कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेत असतो, परंतु तेथे काही भलतेच गवसत असते. असाच प्रकार समुद्रात उतरलेल्या पाणबुड्यांसोबत घडला आहे. समुद्रात डायव्हिंग करताना तुम्हाला धोकादायक किंवा दुर्लभ जीव दिसून आला तर चकित व्हायला होते. परंतु तेथे दुसरे जगच दिसून आले तर धक्काच बसतो. एका पुरातत्व तज्ञासोबत असे घडले [...]

मोठमोठी थडगी पाहून तज्ञ अवाक् काही ठिकाणी आपण कुठल्या तरी गोष्टीचा शोध घेत असतो, परंतु तेथे काही भलतेच गवसत असते. असाच प्रकार समुद्रात उतरलेल्या पाणबुड्यांसोबत घडला आहे. समुद्रात डायव्हिंग करताना तुम्हाला धोकादायक किंवा दुर्लभ जीव दिसून आला तर चकित व्हायला होते. परंतु तेथे दुसरे जगच दिसून आले तर धक्काच बसतो. एका पुरातत्व तज्ञासोबत असे घडले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडातील लेक ओकीचोबीमध्ये एका वेगळ्याच सृष्टीचा शोध लागला आहे. गार्डेनजीकच्या बेटावर एका रुग्णालय आणि दफनभूमीचा शोध लागला होता. ही ऐतिहासिक दफनभूमी असल्याचे वैज्ञानिकांनी त्यावेळी सांगितले होते. पंतु आता पुरातत्व तज्ञ जोश मरानो यांनी ही दफनभूमी जमिनीवर नव्हे तर पाण्यात खोलवर देखील असल्याचे स्पष्ट केले आहे. सरोवराच्या खालीत अनेक रहस्यमय गोष्टींचा शोध दरवर्षी लागत असल्याने या ठिकाणाला रहस्यमय स्वरुप प्राप्त झाले आहे. येथे थडगी असल्याने या ठिकाणाला भूताटकीयुक्त देखील मानले जाते. ही दफनभूमी कुख्यात कैद्यांची असू शकते, त्यांच्या कहाण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही थडगी अमेरिकन सैनिकांच्या देखील असू शकतात. फोर्ट जेफरसनमध्ये तैनात असलेल्या सैनिकांची ही थडगी असण्याची शक्यता आहे. तेथील रुग्णालयात 1890-1900 दरम्यान यलो फीव्हरच्या रुग्णांवर उपचार केले जायचे. याच ठिकाणी अमेरिकन नागरीयुद्धाच्या वेळी कैद्यांना ठेवले जायचे. अशा स्थितीत हे ठिकाण त्यांचा छळ आणि वेदनादायी मृत्यूच्या अनेक कहाण्या स्वत:मध्ये सामावून असल्याचे मरानो यांनी सांगितले आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!