अंबानींच्या संगीत समारंभात सौभाग्यवती रश्मी उद्धव ठाकरेंचा कहर, रेशमी पैठणीत महाराष्ट्राच्या लाडक्या वहिणीचा थाट

Image

Anant Ambani Radhika Merchant Sangeet : जेव्हा अंबानींनी त्यांचा मुलगा आणि सुनेसाठी संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते, तेव्हा केवळ बी-टाऊन स्टार्सच त्यात सहभागी झाले नव्हते तर अनेक राजकारणी कुटुंबातील सदस्यही पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले होते. त्यापैकी एक म्हणजे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे.अनंत आणि राधिकाच्या संगीत कार्यक्रमात दोघेही भारतीय पोशाखात दिसले होते. तथापि, जर आपण रश्मीच्या लुकबद्दल बोललो तर तिने घातलेली साडी आणि ती ज्या पद्धतीने घातली आहे ती साडी प्रेमींपासून मराठी संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना नक्कीच आवडेल. हे आम्ही का म्हणतोय, फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. (फोटो सौजन्य : योगेन शहा)

Rashmi Uddhav Thackeray At Ambani Sangeet : परंपरा आणि संस्कृतीची गोष्ट येते तेव्हा महाराष्ट्रातील जनता मोठ्या अभिमानाने ते मिरवते यात शंकाच नाही. हा अभिमान त्यांच्या प्रत्येक गोष्टीत अगदी कपड्यांत, वागण्या बोलण्यातही दिसून येतो. अंबानी संगीत कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचा लूक पाहून असेच काहीसे जाणवले.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!