खोदकामादरम्यान समोर आले जुने रहस्य

Image

विमानतळ निर्मितीसाठी सुरू होते कार्य ग्रीसच्या एका बेटावर विमानतळ निर्माण करण्याची तयारी सुरू होती. याकरता जमिनीत खोदाकम सुरू असताना अचानक जमिनीखी लोकांना अजब संरचना दिसून आली. त्या संरचनेबद्दल अधिक तपासणी करण्यात आली सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही संरचना 4 हजार वर्षे जुनी असून ती प्राचीन काळातील संस्कृतीशी निगडित अनेक रहस्यांची उकल करू शकते. ही संरचना [...]

विमानतळ निर्मितीसाठी सुरू होते कार्य ग्रीसच्या एका बेटावर विमानतळ निर्माण करण्याची तयारी सुरू होती. याकरता जमिनीत खोदाकम सुरू असताना अचानक जमिनीखी लोकांना अजब संरचना दिसून आली. त्या संरचनेबद्दल अधिक तपासणी करण्यात आली सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही संरचना 4 हजार वर्षे जुनी असून ती प्राचीन काळातील संस्कृतीशी निगडित अनेक रहस्यांची उकल करू शकते. ही संरचना कशासाठी वापरली जायची हे मात्र संशोधकांना शोधून काढता आलेले नाही. ग्रीक बेट क्रेटवर पुरातत्वतज्ञांना एक प्राचीन संरचना आढळून आली आहे. या संरचनेच्या शोधामुळे येथील विमानतळाचे काम रोखावे लागणार आहे. ही संरचना मिनोअन संस्कृतीशी संबंधित असू शकते, याचा कालावधी ख्रिस्तपूर्व 2000 ते 1700 सालामधील होता. त्या काळात क्रेटच्या मॉन्युमेंटल पॅलेसचीही निर्मिती करण्यात आली होती. मिनोअन संस्कृतीशी निगडित मिळालेल्या यापूर्वीच्या संरचनांप्रमाणेच या संरचनेचे काम काय राहिले असेल हे वैज्ञानिकांना समजू शकलेले नाही. उंचीवरून पाहिल्यास ही संरचना एखाद्या मोठ्या चाकाप्रमाणे दिसते. याचे एकूण क्षेत्रफळ 19 हजार चौरस फूट इतके आहे. ग्रीक मिनिस्ट्री ऑफ कल्चरनुसार या संरचनेचा व्यास 157 फूट आहे. याची रचना आणि वैशिष्ट्यो मिनोअनच्या मकबऱ्यांसारखी आहे. या ठिकाणानजीक प्राचीन काळातील प्राण्यांचे अवशेषही मिळाले आहेत. या ठिकाणी प्राचनी काळात अनेक प्रकारचे विधी केले जात असावेत असे मानले जात आहे. आता या ठिकाणाची तपासणी पुरातत्व तज्ञ करणार आहेत. पापुरा हिलवर असलेल्या या संरचनेच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रडार स्थान निर्माण केले जाणार होते. 2027 पर्यंत विमानतळ निर्माण केले जाणार आहे. या विमानतळाचा दरवर्षी 1.8 कोटी लोक वापर करणार असल्याचे मानले जात आहे. ग्रीक सरकार आता रडारस्थानक निर्माण करण्यासाठी अन्य जागेचा शोध घेणार आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!