कार्लो एक्यूटिस होणार पहिले मिलेनियल संत

Image

वयाच्या 15 वर्षी जगभरात झाला प्रसिद्ध : पोपनी दिली मंजुरी वृत्तसंस्था/ वॅटिकन सिटी कॅथोलिक चर्चने व्हिडिओ गेम खेळणाऱ्या एका किशोरवयीनाला पहिला मिलेनियल संत घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. कार्लो एक्यूटिस यांनी स्वत:च्या गेमिंगचा वापर धर्माविषयी प्रचार करण्यासाठी केला होता आणि युवांना जोडण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वत:च्या फॉलोअर्सदरम्यान ते ‘गॉड इन्फ्लुएंसर’ नावाने प्रसिद्ध होते. [...]

वयाच्या 15 वर्षी जगभरात झाला प्रसिद्ध : पोपनी दिली मंजुरी वृत्तसंस्था/ वॅटिकन सिटी कॅथोलिक चर्चने व्हिडिओ गेम खेळणाऱ्या एका किशोरवयीनाला पहिला मिलेनियल संत घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. कार्लो एक्यूटिस यांनी स्वत:च्या गेमिंगचा वापर धर्माविषयी प्रचार करण्यासाठी केला होता आणि युवांना जोडण्यास त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वत:च्या फॉलोअर्सदरम्यान ते ‘गॉड इन्फ्लुएंसर’ नावाने प्रसिद्ध होते. एक्यूटिस यांचा 2006 साली वयाच्या 15 व्या वर्षी ल्युकेमियामुळे मृत्यू झाला होता. कॅथोलिक चर्चमध्ये संत म्हणून मान्यता प्राप्त करण्यास दशकांचा कालावधी लागतो. परंतु एक्यूटिस प्रकरणी जलद प्रक्रिया राबविण्यात आली आहे. एक्यूटिस यांनी जगभरात मोठ्या संख्येत स्वत:चे अनुयायी निर्माण केले होते. 1980 ते 1996 दरम्यान जन्मलेल्या लोकांना मिलेनियल म्हटले जाते. कॅथोलिक चर्च डिजिटल युगात युवा पिढीसोबत जोडण्यासाठी इच्छुक आहे. अशा स्थितीत एक्यूटिस यांची कहाणी चर्चसाठी अत्यंत सहाय्यभूत ठरते, कारण ते कॅथोलिक युवांदरम्यान अत्यंत लोकप्रिय आहेत. चर्चच्या वतीने संत होण्याच्या प्रक्रियेत सर्वसाधारणपणे उमेदवारांसाठी दोन चमत्कारांचे श्रेय दिले जाणे आवश्य असते, ज्यातील प्रत्येक कथित चमत्कारासाठी सखोल चौकशी केली जाते. मे महिन्यात एक्यूटिस यांच्याकडून करण्यात आलेल्या दुसऱ्या चमत्काराला पोप फ्रान्सिस यांनी मान्यता दिली. या निर्णयाने एक्यूटिस यांना संत घोषित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. यानंतर अंतिम टप्प्यात पोप संत होण्याच्या बाजूने मतदानाची घोषणा करतात. सोमवारी हा टप्पा देखील पूर्ण झाला. कॉर्डिनल्सकडून 14 अन्य लोकांसोबत एक्यूटिस यांना संत घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2025 मध्ये होणार घोषणा एक्यूटिस यांना संत घोषित करण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु पुढील वर्षी ही घोषणा होण्याची शक्यता आहे. संत घोषित करण्याचा सोहळा पोप यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. हा सोहळा वेटिकल सिटीच्या सेंट पीटर स्क्वेयरमध्ये होण्याची अपेक्षा असून यात हजारो लोक सामील होतील. यादरम्यान एक्यूटिस यांना औपचारिक स्वरुपात संत म्हणून घोषित करण्यात येईल.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!