गुजरातने चार मुख्यमंत्री पाहिले, पण CMO मध्ये एक IAS अधिकारी कायम होता; कोण आहेत 'केके'?

Image

नवी दिल्ली- गुजरातमधील माजी आयएएस अधिकारी के कैलाशनाथन (Kuniyil Kailashnathan ) हे अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यातील सर्वात आवडीचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा कार्यकाळ तब्बल अकरा वेळा वाढवण्यात आला होता. यावरून गुजरात सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ते किती महत्त्वाचे होते हे लक्षात येईल. ३० जून रोजी त्यांची सेवानिवृत्ती होती. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी के कैलाशनाथन यांचा योग्य सन्मान करत त्यांना निरोप दिला. कैलाशनाथन हे गेल्या अनेक वर्षांपासून गुजरातमधील एक शक्तीशाली अधिकारी म्हणून काम करत होते. पंतप्रधान मोदी यांचे ते खास होते. २०२३ मध्येच ते अतिरिक्त प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून निवृत्त होणार होते, पण, त्यांचा कार्यकाळ तब्बल ११ वेळा वाढवण्यात आला. सध्या ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काम करत होते. ३३ वर्षांपर्यंत त्यांनी गुजरात कॅडरचा अधिकारी म्हणून काम केलं. २१ मार्च २०२३ मध्ये ते निवृत्त झाले होते. के कैलाशनाथन यांनी आतापर्यंत गुजरातच्या चार मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं. यात नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल , विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल यांचा यात समावेश होतो. मुख्यमंत्री कार्यालयात ते महत्त्वाचं काम करत होते. भूपेंद्र पटेल यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, २००६ पासून कैलाशनाथन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलं. ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. दशकभरापेक्षा अधिक काळ त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून काम केलं आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर कैलाशनाथन यांनी निवृत होणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे ते निवृत्त झाले आहेत. सरकारनेही यासाठी परवानगी दिली आहे. मोदींचे विश्वासू असल्याने त्यांना दिल्लीमध्ये महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा कैलाशनाथन यांना राज्यातील राजकीय वर्तुळात सुपर सीएम म्हटलं जात होतं.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!