‘थोडा हसाएंगे, थोडा तोडेंगे’मध्ये सारा

Image

आयुष्मान खुरानासोबत जमणार जोडी सारा अली खान आता स्वत:च्या कारकीर्दीत चित्रपटांसोबत प्रयोग करत आहे. तसेच मोठ्या पडद्यावर ती आता नवनव्या अभिनेत्यांसोबत दिसून येणार आहे. कार्तिक आर्यन, अक्षय कुमार आणि विक्की कौशल यासारख्या प्रभावी कलाकारांसोबत झळकल्यावर साराची जोडी आता अभिनेता आयुष्मान खुरानासोबत जमणार आहे. दोघांची ही नवी जोडी एका चित्रपटात दिसून येणर आहे. आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल [...]

आयुष्मान खुरानासोबत जमणार जोडी सारा अली खान आता स्वत:च्या कारकीर्दीत चित्रपटांसोबत प्रयोग करत आहे. तसेच मोठ्या पडद्यावर ती आता नवनव्या अभिनेत्यांसोबत दिसून येणार आहे. कार्तिक आर्यन, अक्षय कुमार आणि विक्की कौशल यासारख्या प्रभावी कलाकारांसोबत झळकल्यावर साराची जोडी आता अभिनेता आयुष्मान खुरानासोबत जमणार आहे. दोघांची ही नवी जोडी एका चित्रपटात दिसून येणर आहे. आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल 2’ तर साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. अशास्थितीत दोघांनाही पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. आयुष्मान आणि सारा आता अॅक्शन कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. धर्मा प्रॉडक्शन आणि गुनीत मोंगा यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. आयुष्मान आणि सारा यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश कौशिक करणार आहे. आकाशने यापूर्वी भुल-भूलैया-2 आणि हाउसफुल-4 तसेच फ्लाइंग जट यासारख्या चित्रपटांसाठी कहाणी लिहिली आहे. आयुष्मान आणि साराच्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. तर या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!