रुग्णांना या ठिकाणी मिळतील स्वस्त औषधे, किंमत 50 टक्क्याहून कमी

Image

महागडा उपचार खर्च अनेकांना परवडणारा नसतो. त्यात औषधांचा खर्च तर अधिक असतो. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन औषधी परियोजना सुरू केली आहे. या औषधी केंद्रावर गेल्यास तुम्हाला ब्रँडेड औषधांपेक्षा कमी किमतीत म्हणजे 50 टक्के कमी किमतीत औषधे खरेदी करता येणार आहे.

देशात केंद्र सरकारकडून गरीब आणि गरजवंतासाठी अनेक योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊनच या योजना तयार केल्या जातात. आजारी पडल्यावर लोकांचा प्रचंड पैसा खर्च होतो. आजारापेक्षा औषधे भयंकर अशी म्हणण्याची वेळही येते. त्यावरही प्रचंड पैसा खर्च होतो. त्यामुळेच भारत सरकारने 2008मध्ये जन औषधी स्कीम सुरू केली आहे. या स्किममधून गरजू आणि गरीबांना मोठी मदत दिली जात असते. 2015मध्ये या योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री जन औषधी योजना असं केलं. तर 2016मध्ये त्याचं नाव प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना असं नाव बदलून ही योजना पुन्हा नव्याने सुरू केली. भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत रुग्णांना अत्यंत कमी किंमतीत दिली जातात. खासगी मेडिकलमधील औषधांपेक्षा हे जेनेरिक औषधे किती स्वस्त असतात? आपल्या आसपासच्या जन औषधी केंद्रांची कशी माहिती मिळवायची? याचीच माहिती जाणून घेऊया. 50 टक्के कमी किंमत देशातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाचे औषधे देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी परियोजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणताही व्यक्ती प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर जाऊन जेनेरिक औषधे खरेदी करू शकतो. या केंद्रावर तुम्हाला 1759 अंतर्गत औषधांसोबतच 280 सर्जिकल इक्विपमेंट मिळतात. या औषधांच्या किंमतीबाबत म्हणाल तर हे औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत 50 टक्के कमी किंमतीत मिळतात. या केंद्रांवर तुम्हाला अँटी अॅलर्जी, अँटी डायबेटिक, अँटी कॅन्सर, अँटी पायरेटिक्स आणि व्हिटामिन, मिनरल्स तसेच अनेक प्रकारचे फूड सप्लीमेंट्सही मिळतील. या केंद्रांवर महिलांसाठी सॅनिटरी नॅपिकनही दिली जातात. केंद्राची माहिती अशी मिळवा जर तुम्हाला स्वस्तातील औषधे खरेदी करायची असतील आणि तुमच्या शहरात जनऔषधी केंद्र कुठे आहेत हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्याची माहिती ऑनलाइन घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जन औषधी केंद्राची अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पीएमबीजेपी सेक्शनवर जावं लागेल. त्यानंतर दिसणाऱ्या ऑप्शनला लोकेट करून केंद्रावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करावा लागेल. तिथे तुम्हाला जिल्ह्यातील सर्व औषधी केंद्राची यादी दिसेल. त्यातील तुमच्या परिसरातील केंद्राचा पत्ता घेऊन तुम्हाला केंद्रावर जाता येईल.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!