सुर्यकुमार यादवची पत्नी रात्री कुशीत घेऊन झोपली टीम इंडियाची ट्रॉफी, नेटकरी म्हणाले तुझी बायको अस्सल हिरा गड्या

Image

सूर्यकुमार यादव सध्या खूप ट्रेंडिंग आहे. त्याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात घेतलेल्या कॅचमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्या एका कॅचने भारताला विजयाच्या अजून जवळ आणून ठेवले. त्याने जेव्हा कॅच घेतली तेव्हा त्या क्षणी सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदाने वेडे झाले होते. टीम इंडिया जिंकल्यावर सूर्या सोबत अजून एक व्यक्ती खूप आनंदात होती. ती म्हणजेत्याची पत्नी देविशा शेट्टी देविशा नेहमीच सूर्याकुमारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. विश्वचषकाच्या विजयानंतर दोघांनी एकत्रितपणे विजय साजरा केला.त्यांनी त्यांचे हॅप्पी मोमेंट्स सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये ते ट्रॉफीच्या बाजूला झोपलेले दिसले. या फोटोने अनेकांची मने जिंकली. देविशा तशी लाईमलाईट पासून दूर असते. पण या आनंदाच्या क्षणांत सुर्यकुमार यादव सोबत तिची देखील मोठी चर्चा होत आहे. ती एक उत्तम पत्नी तर आहेच पण सोबतच फॅशन डिव्हा सुद्धा आहे. तिच्या लुक आणि स्टाईलने अनेकदा कित्त्येक अभिनेत्रींना सुद्धा मागे टाकले आहे. (फोटो सौजन्य :- devishashetty_, surya_14kumar)

Suryakumar Yadav Wife Photos : इंडिया T20 World Cup जिंकल्यापासून सर्वच क्रिकेटप्रेमी खूप आनंदात आहेत याच शंकाच नाही पण तुम्हाला माहीत आहे का... क्रिकेटर्सच्या पत्नीही यावेळी खूप मोठं सेलिब्रेशन साजरं करत आहे. सुर्यकुमार यादवच्या बायकोने तर टीम इंडियाची ट्रॉफी सोडलीच नाही. कुशीत घेऊन झोपली. तर अशा या अस्सल हि-याचं अस्मानी सौंदर्य पाहिलं का?

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!