राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Image

राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. कुठं मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागानं (IMD) सांगितलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत. राज्यात उद्यापर्यंत (30 जूनपर्यंत) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!