ब्रिटनमधील निवडणुकीपूर्वी सुनक यांच्याकडून देवदर्शन

Image

स्वामीनारायण मंदिरात सपत्नीक पूजा : भाविकांशी संवाद वृत्तसंस्था/ लंडन देशात 4 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या 4 दिवस आधी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात पोहोचून पूजा केली. सुनक यांचा ताफा शनिवारी मंदिर परिसरात पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांनी देवदर्शन घेण्यासोबतच उपस्थित लोकांशी संवादही साधला. सुनक यांनी [...]

स्वामीनारायण मंदिरात सपत्नीक पूजा : भाविकांशी संवाद वृत्तसंस्था/ लंडन देशात 4 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या 4 दिवस आधी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात पोहोचून पूजा केली. सुनक यांचा ताफा शनिवारी मंदिर परिसरात पोहोचताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांनी देवदर्शन घेण्यासोबतच उपस्थित लोकांशी संवादही साधला. सुनक यांनी स्वामीनारायण मंदिरातील लोकांना संबोधित करताना आपल्या भाषणाची सुऊवात टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या विजयाने केली. आजच्या क्रिकेट सामन्याच्या निकालाने तुम्हाला आनंद झाला असेल, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ऋषी सुनक यांच्या एक दिवस आधी विरोधी पक्षनेते आणि मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर हेही लंडनमधील एका मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी अनेक मुलांशी संवाद साधत पूजेतही सहभाग घेतला. त्यांनीही परमेश्वराच्या मूर्तीवर जल अर्पण केले. स्टार्मर यांनी आपल्या भाषणात किंग्सबरी मंदिराचे वर्णन कऊणेचे प्रतीक म्हणून केले. तसेच येथील लोकांशी बोलताना त्यांनी निवडणूक जिंकली तर आपले सरकार ब्रिटिश भारतीय समुदायासाठी काम करेल. देशाचे तुकडे करणे किंवा तोडण्याचे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये 4 जुलैला तेथील संसदेची निवडणूक होत आहे. पूर्वनिर्धारित कालावधीपेक्षा ही निवडणूक लवकर होत असल्याने ती मध्यावधी निवडणूक म्हणून ओळखली जात आहे. या निवडणुकीत सध्या सत्ताधारी असलेल्या हुजूर पक्षाचा धुव्वा उडणार आहे, असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षण संस्थानी काढला आहे. मजूर पक्षाला दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संसदेत 650 जागा आहेत. हुजूर पक्षाला 650 पैकी केवळ 65 ते 117 जागा मिळतील असे अनुमान आहे. मजूर पक्षाला 450 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षाचे नेते कीर स्टार्मर हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आरुढ होतील, असा सर्व सर्वेक्षण संस्थांचे अनुमान आहे. भारताशी संबंध सुधारणार मजूर पक्षाचा विजय होऊन स्टार्मर यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भारताशी संबंध सुधारले जातील. तसेच, भारताशी मुक्त व्यापार करार करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल. मजूर पक्षाचा विजय झाल्यास डेव्हिड लॅमी यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याची घोषणा इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात केली आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!