Eknath Shinde : क्वालीटी बघा, एकनाथ शिंदेंनी विधानसभेत नवा अन् जुना शालेय गणवेश दाखवला

Image

Eknath Shinde, at Vidhansabha : शालेय गणवेशाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुना आणि नवीन शालेय गणवेश सर्वांसमोर सादर केला. दोन्ही गणवेश दाखवत नव्या गणवेशाची क्वालिटी बघा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लहान मुलं आहेत, त्यांचा गणवेश, त्यांचा पोषण आहार यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाही. गणवेश आणि पोषण आहाराबाबत कोणी कॉप्रोमाईज करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करा. हे पुण्ण्याचे काम आहे. जो यामध्ये भ्रष्टाचार करेल. त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला. तुमच्या नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोतएकनाथ शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत फेर नेरेटिव्ह चालवलं. आम्ही कोठे तरी कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. लोकांच्या मनात तुम्ही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. जनता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला. माता भगिणींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ,ज्येष्ठांसाठी योजना आणल्या. वारकऱ्यांसाठी देखील योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जीआरही आपण काढला. या योजनेनुसार पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे. 46 हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 46 हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार आहे. याबाबत विरोधकांना आनंद व्हायला पाहिजे होता. मात्र, जनतेला द्यायचं म्हटलं की, विरोधकांच्या पोटात का दुखतं? हे मला समजलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं. बाळासाहेब नेहमी सांगायचे चांगल्याला चांगलं म्हणा. चुकत असेल तिथे सूचना करा. परंतु चांगल्या चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलं असं माझ्या ऐकिवात नाही. बिनबुडाची टीका आपण टाळली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणजे महायुतीच्या भावंडांकडून माताभगिनींना आहेर आहे. Maharashtra Vidhan Sabha Live : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन | ABP Majha | 02 July 2024 इतर महत्वाच्या बातम्या Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"

Eknath Shinde, at Vidhansabha : शालेय गणवेशाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुना आणि नवीन शालेय गणवेश सर्वांसमोर सादर केला. दोन्ही गणवेश दाखवत नव्या गणवेशाची क्वालिटी बघा, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लहान मुलं आहेत, त्यांचा गणवेश, त्यांचा पोषण आहार यामध्ये कोणतीही तडजोड करायची नाही. गणवेश आणि पोषण आहाराबाबत कोणी कॉप्रोमाईज करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करा. हे पुण्ण्याचे काम आहे. जो यामध्ये भ्रष्टाचार करेल. त्याच्यावर कारवाई करणार असल्याचा इशाराही एकनाथ शिंदेंनी दिला. तुमच्या नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत एकनाथ शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत फेर नेरेटिव्ह चालवलं. आम्ही कोठे तरी कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. लोकांच्या मनात तुम्ही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या नेरेटिव्हला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत. जनता तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अर्थसंकल्प मांडला. माता भगिणींचे आयुष्य उजळून टाकणाऱ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी ,ज्येष्ठांसाठी योजना आणल्या. वारकऱ्यांसाठी देखील योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जीआरही आपण काढला. या योजनेनुसार पात्र असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे. 46 हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 46 हजार कोटी रुपये राज्यातील माता भगिनींना देण्याचे काम सरकार करणार आहे. याबाबत विरोधकांना आनंद व्हायला पाहिजे होता. मात्र, जनतेला द्यायचं म्हटलं की, विरोधकांच्या पोटात का दुखतं? हे मला समजलेलं नाही. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं. बाळासाहेब नेहमी सांगायचे चांगल्याला चांगलं म्हणा. चुकत असेल तिथे सूचना करा. परंतु चांगल्या चांगलं कधी विरोधी पक्षाने म्हटलं असं माझ्या ऐकिवात नाही. बिनबुडाची टीका आपण टाळली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना म्हणजे महायुतीच्या भावंडांकडून माताभगिनींना आहेर आहे. Maharashtra Vidhan Sabha Live : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन | ABP Majha | 02 July 2024 इतर महत्वाच्या बातम्या Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण" Education Loan Information: Calculate Education Loan EMI

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!