सर्वात जुन्या मद्याचा स्पेनमध्ये लागला शोध

Image

2000 वर्षांपूर्वी झाली होती निर्मिती दक्षिण स्पेनमध्ये उत्खननादरम्यान 2 हजार वर्षे जुना रोमन अंत्येष्टि कलश मिळाला आहे. या कलशात आतापर्यंतची सर्वात जुनी दारू द्रव्य स्वरुपात आढळून आली आहे. 2019 मध्ये कार्मोनोमध्ये एका घराच्या नुतनीकरणादरम्यान शोधण्यात आलेल्या कलशाच्या सामग्रीचे विश्लेषण कॉर्डोबा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या एक पथकाकडून करण्यात आले. याच्याशी निगडित अध्ययन आता प्रकाशित करण्यात आले आहे. कलशात [...]

2000 वर्षांपूर्वी झाली होती निर्मिती दक्षिण स्पेनमध्ये उत्खननादरम्यान 2 हजार वर्षे जुना रोमन अंत्येष्टि कलश मिळाला आहे. या कलशात आतापर्यंतची सर्वात जुनी दारू द्रव्य स्वरुपात आढळून आली आहे. 2019 मध्ये कार्मोनोमध्ये एका घराच्या नुतनीकरणादरम्यान शोधण्यात आलेल्या कलशाच्या सामग्रीचे विश्लेषण कॉर्डोबा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या एक पथकाकडून करण्यात आले. याच्याशी निगडित अध्ययन आता प्रकाशित करण्यात आले आहे. कलशात अंत्यसंस्काराचे अवशेष, जाळलेले हस्तीदंत आणि सुमारे 4.5 लीटर लाल रंगाचा द्रवपदार्थ आढळून आला असे अध्ययनाचे प्रमुख लेखक आणि कार्बनिक केमिकल सायन्सचे प्राध्यापक जोस राफेल रुइज अर्रेबोला यांनी सांगितले आहे. पुरातत्वतज्ञांनी कलश उघडल्यावर आम्ही स्तब्धच झालो. यानंतर टीमने कलशातील द्रवपदार्थाचे रासायनिक विश्लेषण केले असता ते मद्य असल्याचे स्पष्ट झाले. मद्य सर्वसाधारणपणे फारकाळ टिकत नाही आणि रासायनिक स्वरुपात ते अस्थिर असते, यामुळे ते इतका काळ टिकणे आश्चर्यकारक होते. मद्याला एका सीलद्वारे संरक्षित करण्यात आले होते, परंतु ते कशाद्वारे तयार झाले हे स्पष्ट नसल्याचे अर्रेबोला यांनी सांगितले आहे. पांढरी वाइन अर्रेबोला यांच्यानुसार रासायनिक विश्लेषणाद्वारे टीमने द्रवपदार्थ म्हणजे पांढरी वाईन असल्याचे ओळखले. कारण यात सिरिंजिक अॅसिड नव्हते, जे केवळ लाल वाइनमध्ये असते. यात खनिज मीठ संरचना देखील क्षेत्रात सध्या मिळणाऱ्या फिनो वाइनसमान आहे. हा प्रकार काहीसा अनोखा आहे. आम्ही याला शोधणे आणि याचे विश्लेषण करण्याची संधी मिळाल्याने भाग्यशाली ठरलो आहोत. अशाप्रकारची गोष्ट काही लोकच स्वत:च्या आयुष्यात एकदाच पाहू शकतात असे अर्रेबोला यांचे सांगणे आहे. विक्रमाची नोंद संशोधकांनुसार त्यांच्या शोधाने द्रव स्वरुपातील सर्वात जुन्या मद्याचा शोध लावला आहे. यापूर्वी हा विक्रम जर्मनीत आढळलेल्या स्पीयर वाइनच्या नावावर होता. जी सुमारे 1700 वर्षांपूर्वीची मानली जाते. परंतु रासायनिक विश्लेषणाद्वारे स्पीयर वाइनच्या काळाची पुष्टी करण्यात आलेली नाही. हे मकबऱ्यात आढळलेल्या 6 अत्येंष्टि कलशांपैकी एक होते.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!