World Social Media Day 2024: तुमचेही मुलं दिवसभर फोनवर रिल्स अन् शॉर्ट्स पाहतात?मग 'या' सोप्या टिप्सची घ्या मदत

Image

World Social Media Day 2024: आजच्या काळात फोन हा प्रत्येक व्यक्तीची गरज बनवली आहे. अनेक कामांसाठी आपल मोबाईलवर अवलंबून राहतो. यामुळे अनेक कामे सोपी झाली आहे तर काही तोटे देखील आहे. खास करून लहान मुलांना काही गोष्टी येत नसेल पण फोन वापरता येतो. त्यावर रिल्स पाहणे , गेम खेळणे, शॉर्ट व्हिडिओ पाहणे हा आवडता टाइमपास बनला आहे. पण असे करणे मुलांच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता. अनेकवेळा मुले मोठ्यांनाच पाहून फोनचा वापर करतात. लहान मुलांना फोनपासून दूर ठेवायचे असेल तर सर्वात आधी स्वत:वर नियंत्रण ठेवावे. यासाठी मुलांसोबत वेळ घालवाव. त्यांच्यासोबत गेम्स खेळावे. यामुळे मुले आणि तुम्ही मोबाइलपासून दूर राहाल. तसेच तुमच्या नात्यात गोडवा देखील वाढेल. लहान मुलांना प्रत्येक गोष्ट रागाने सांगितली पाहिजे असे नाही. कधी कधी त्यांना बसून प्रेमाने समजावने देखील फायद्याचे ठरते. मुलांना फोन वापरण्यासाठी एक वेळ निश्चित करावी. नंतर मुले फोनवर काय पाहत आहेत यावर देखील लक्ष ठेवावे. आजकालचे पालक मुलांशी कठोरपणे वागत नाही. यामुळे मुलांच्या अति लाडामुळे वाया जातात. विशेषत: जेव्हा आई-वडील दोघेही नोकरी करत असतात तेव्हा ते कामावरून परतल्यावर मुलांचे लाड करतात. पण मुलांना फोनपासून दूर ठेवायचे असेल तर शिस्त लावणे गरजेचे आहे. कधी कधी मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कठोर होणे चांगले असते. जर मुलांना फोनपासून दूर ठेवायचे असेल तर कामांमध्ये व्यस्त ठेवावे. यासाठी मुलांना रूमची स्वच्छता किंवा बागकाम करायला सवय लावावी. यामुळे मुलांचा स्क्रिन टाइम कमी करण्यास मदत मिळेल.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!