आयटीआर ते क्रेडिट कार्डचे नियम! वाचा जुलै महिन्यात कोणकोणते नियम बदलणार!

Image

आयटीआर ते क्रेडिट कार्डचे नियम! वाचा जुलै महिन्यात कोणकोणते नियम बदलणार!

July Financial Deadlines: जून महिना संपत आला आहे. लवकरच जुलै महिना चालू होईल. आगामी जुलै महिन्यात अनेक आर्थिक कामांची डेडलाईन संपणार आहे. यामध्ये पेटीएम वॉलेटपासून ते क्रेडिट कार्डपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. पेटीएमची पॅरेन्ट कंपनी वन97 कम्यूनिकेशन्सने सांगितल्यानुसार पेटिएम पेमेंट्स बँकेचे इनअॅक्टिव्ह वॉलेट 20 जुलै 2024 पासून बंद करण्यात येणार आहेत. या निर्णयाअंतर्गत एका वर्षांपासून अधिक काळासाठी कोणतेही व्यवहार नसलेले इनअॅक्टिव्ह वॉलेट्स बंद करण्यात येतील. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांतही बदल करण्यात येत आहे. हे नवे नियम 1 जुलै 2024 पासून हे नवे नियम लागू होतील. नव्या नियमानुसार कार्ड रिप्लेसमेंटसाठी ग्राहकांना 100 ऐवजी 200 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डच्या लाउंज अॅक्सेसच्या नियमांतही बदल करण्यात येणार आहेत. आता ग्राहकांना एका तिमाहीत 1 देशांतर्गत एयरपोर्ट लाउंज अॅक्सेस मिळणार आहे. अॅक्सिस बँकने सर्व सिटी बँक क्रेडिट कार्ड होल्डर्सना त्यांचे क्रेडिट कार्ड अकाऊंट 15 जुलैपर्यंत ट्रान्सफर करण्याचे सांगितले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 साठी आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. या तारखेनंतर तुम्हाला दंड भरून आयटीआर भरावा लागेल. एसबीआयने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सरकारी ट्रान्झेक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्स देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा निर्णय 1 जुलै 2024 पासून लागू होईल. image 8

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!