Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’साठी कोण असेल पात्र?

Image

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार आहे. या योजनेचा लाभ २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायती, महा ई सेवा कार्यालयांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेला ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील. भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती दिली जाईल.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!