Passport Scam : पासपोर्ट घोटाळ्याचे धागेदोरे नागपुरात;सीबीआयच्या पथकाचे छापे

Image

नागपूर : केंद्रीय गुन्‍हे अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) देशातील पासपोर्ट सेवा केंद्रांच्या (पीएसके) घोटाळ्यात मुंबई, नाशिक आणि नागपूर ३३ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान छाप्यात पासपोर्ट दलालांची सीबीआयच्या पथकाद्वारे चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. सीबीआयने पासपोर्ट सेवा केंद्रांच्या (पीएसके) ३२ आरोपी पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक, दलालांना कथित भ्रष्टाचारप्रकरणी राज्यासह देशभरात छापे सुरू आहेत. राज्यात मुंबई, नाशिक, नागपुरातील ३३ ठिकाणी धाड टाकण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने मालाड, लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील १४ पासपोर्ट सहाय्यक, वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यकांविरोधात १२ गुन्हे नोंदविले आहेत. याशिवाय नागपुरातील मानकापूर परिसरात सीबीआयच्या पथकाने तपासणी केली. यापूर्वीच विभागीय पासपोर्ट कार्यालयांच्या (आरपीओ) अंतर्गत १८ पासपोर्ट दलालांविरोधातही गुन्हे दाखल केले आहेत. कागदपत्रांमध्ये त्रुटी असूनही पासपोर्ट देण्याच्या प्रणालीत अधिकाऱ्यांनी दलालांच्या संगनमताने पासपोर्ट मिळवून दिल्याचा आरोप आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!