शाही सामूहिक विवाह सोहळा, अंबानींकडून ५१ जोडप्यांना सोन्याचे दागिने, वर्षाचा किराणा आणि इतक्या लाखांचा चेक

Image

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातर्फे शाही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, २ जुलै रोजी नवी मुंबई इथं हा सोहळा दिमाखात पार पडला. गरीब कुटुंबातील ५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता.वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. आकाश अंबानी, त्याची पत्नी श्लोका अंबानी यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावल. तर ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या शाही सामूहिक सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. नवी मुंबई इथं पार पडलेल्या या सोहळ्यासाठी १०००हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

Mukesh nita ambani organise samuhik vivah: ​

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!