विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडून मुस्लीम चेहऱ्याला संधी, उमेदवारीसाठी या तीन बड्या नेत्यांची नावं चर्चेत

Image

Legislative Council Elections News : राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) 11 जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झालीय. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून अनेकजण इच्छुक आहेत. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आपल्या आमदार कोट्यातील जागेवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे.विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून 'या' नावांचा जोरदार चर्चालोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीकडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे वजाहत मिर्जा (Wajahat Mirza) यांच्या जागी मुस्लिमच चेहरा देण्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात वजाहत मिर्जा, मुज्जफर हुसेन व नसीम खान यांचे नाव आघाडीवर आहे. कालपासून यासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरवात देखील झाली आहे. 5 जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 9 जागेसाठी ही निवडणूक होणार असून काँग्रेसच्या कोट्यात एक जागा येत आहे.11 जागांसाठी निवडणूक जाहीर, 12 जुलैला मतदानविधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती 9 जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.'या' आमदारांचा कार्यकाल संपला मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. महत्वाच्या बातम्या:विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी, आत्तापर्यंत 35 जणांनी केले अर्ज

Legislative Council Elections News : राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) 11 जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झालीय. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून अनेकजण इच्छुक आहेत. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलाय. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आपल्या आमदार कोट्यातील जागेवर मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून 'या' नावांचा जोरदार चर्चा लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीकडून एकही मुस्लिम उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे वजाहत मिर्जा (Wajahat Mirza) यांच्या जागी मुस्लिमच चेहरा देण्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात वजाहत मिर्जा, मुज्जफर हुसेन व नसीम खान यांचे नाव आघाडीवर आहे. कालपासून यासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरवात देखील झाली आहे. 5 जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 9 जागेसाठी ही निवडणूक होणार असून काँग्रेसच्या कोट्यात एक जागा येत आहे. 11 जागांसाठी निवडणूक जाहीर, 12 जुलैला मतदान विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती 9 जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. 'या' आमदारांचा कार्यकाल संपला मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. महत्वाच्या बातम्या: विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी, आत्तापर्यंत 35 जणांनी केले अर्ज

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!