गडगंज श्रीमंत नीता अंबानीनी नम्रतेने केलं मोहन भागवतांचे वेलकम,भडक ऑरेंज साडीत खुलून दिसली दोन सूनांची सासूबाई

Image

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. अनंत १२ जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू असून कार्ड वाटपाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अंबानी कुटुंब आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही आणि अशा परिस्थितीत ते त्यांच्या खास पाहुण्यांना स्वतः आमंत्रित करणार आहेत.दरम्यान, मोहन भागवत अँटिलियाला पोहोचले जिथे अनंतसोबतच त्याचे वडील मुकेश अंबानी आणि आई नीता अंबानी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सर्वांना त्याची स्टाईल आवडली. अनंतचे प्राण्यांबद्दलचे प्रेम त्याच्या कपड्यांतून स्पष्टपणे दिसतच होते. पण यावेळी सर्वाधिक लक्ष वेधलं ते वरमाईच्या लुकने. नीता अंबानींनी कोणतेही भरगच्च दागिने घातले नसूनही फक्त त्यांच्या आकर्षक साडीनेच सर्वत्र धुमाकूळ घातला. (फोटो सौजन्य : योगेन शहा)

Mohan Bhagwat At Nita Mukesh Ambani Home : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या कार्ड्सचे वाटप आता सुरू झाले आहे. अंबानी कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे, त्यामुळे आता मोहन भागवत त्यांच्या घरी पोहोचले. जेथे अनंत, राधिका, नीता आणि मुकेश अंबानी यांनी त्यांचे खूपच नम्रतेने स्वागत केले.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!