दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!

Image

मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून विरोध केला जात आहे. हा विरोध करण्यासाठी हजारो आंबेडकरी जनता दीक्षाभूमी परिसरात जमा झाले असून आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि आंदोलन पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस नेमंक काय म्हणाले?दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.एकमत झाल्यावर काम करू- देवेंद्र फडणवीसदीक्षा भूमीला जे पार्किंगचे काम केले जात आहे, ते होऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. हा आराखडा स्मारक समितीने केलेला आहे. आंदोलकांची स्मारक समितीसोबत एक बैठक होईल. स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन पुढचे काम करण्यात येईल. अशा वास्तूसंदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू. स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला व काम सुरु केले. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ. त्यानंतरच काम सुरु केले जाईल, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी केले. नेमकं प्रकरण काय? नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटींची वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत . मात्र यातील अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचेदेखील आंदोलकांनी सांगितले. हेही वाचा :"अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीला धोका", आंबेडकरी समाजाच्या दीक्षाभूमीतील आंदोलनावर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया!Nagpur News : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद चिघळला; दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांचे तीव्र आंदोलन पंकजा मुंडेसह सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून पाच नावं जाहीर

मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून विरोध केला जात आहे. हा विरोध करण्यासाठी हजारो आंबेडकरी जनता दीक्षाभूमी परिसरात जमा झाले असून आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि आंदोलन पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली. देवेंद्र फडणवीस नेमंक काय म्हणाले? दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. एकमत झाल्यावर काम करू- देवेंद्र फडणवीस दीक्षा भूमीला जे पार्किंगचे काम केले जात आहे, ते होऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. हा आराखडा स्मारक समितीने केलेला आहे. आंदोलकांची स्मारक समितीसोबत एक बैठक होईल. स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन पुढचे काम करण्यात येईल. अशा वास्तूसंदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू. स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला व काम सुरु केले. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ. त्यानंतरच काम सुरु केले जाईल, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी केले. नेमकं प्रकरण काय? नागपूर च्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 200 कोटींची वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत . मात्र यातील अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला आहे. अंडरग्राऊंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे अशी आंदोलकांची मागणी आहे. इतर विकासकामांमध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडूजी व सुशोभिकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचेदेखील आंदोलकांनी सांगितले. हेही वाचा : "अंडरग्राऊंड पार्किंगमुळे दीक्षाभूमीला धोका", आंबेडकरी समाजाच्या दीक्षाभूमीतील आंदोलनावर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया! Nagpur News : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगचा वाद चिघळला; दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांचे तीव्र आंदोलन पंकजा मुंडेसह सदाभाऊ खोतांना विधानपरिषदेवर संधी, भाजपकडून पाच नावं जाहीर

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!