वेक अप डेड मॅन’चे चित्रिकरण सुरू

Image

डेनियल व्रेग झळकणार अभिनेता डेनियल क्रेगचा आगामी चित्रपट ‘वेक अप डेड मॅन’चे सध्या चित्रिकरण सुरू आहे. हा चित्रपट ‘नाइफ्स आउट’ फ्रेंचाइजीचा पुढील भाग आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रेक्षकांचा उत्साह वाढवत दिग्दर्शक रियान जॉन्सनने सेटवरील डेनियलचे एक छायाचित्र शेअर केले आहे. डेनियल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. लेखक [...]

डेनियल व्रेग झळकणार अभिनेता डेनियल क्रेगचा आगामी चित्रपट ‘वेक अप डेड मॅन’चे सध्या चित्रिकरण सुरू आहे. हा चित्रपट ‘नाइफ्स आउट’ फ्रेंचाइजीचा पुढील भाग आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा लागून राहिली आहे. प्रेक्षकांचा उत्साह वाढवत दिग्दर्शक रियान जॉन्सनने सेटवरील डेनियलचे एक छायाचित्र शेअर केले आहे. डेनियल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. लेखक आणि दिग्दर्शक जॉन्सनच्या स्टार-थ्रीक्वलमध्ये डेनियल क्रेग हा बेनोइट ब्लँक या गुप्तहेराच्या स्वरुपात परतणार आहे. या चित्रपटात जोश ओकोनोर, कॅली स्पॅनी, अॅन्ड्य्रू स्कॉट, केरी वॉशिंग्टन, जेरेमी रेनर, मिला कुनिस, डेरिल मॅककॉर्मेक आणि जोश ब्रोलिन हे कलाकार दिसून येणार आहेत. मर्डर मिस्ट्री जॉनर फ्रेंचाइजीचा चित्रपट नाइव्स आउट हा ब्लँकच्या तपासावर आधारित आहे. 2019 मध्ये प्रदर्शित नाइव्स आउट हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला होता. यात क्रेग, क्रिस इवान्स, एना डी आर्मस, जेमी ली कर्टिस, क्रिस्टोफर प्लमर आणि अन्य कलाकार दिसून आले होते. चित्रपटात जगभरात 2588 कोटी रुपयांची कमाई केली होती.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!