सोनं खातंय भाव! कधीकाळी 63 रुपयांत यायचं एक तोळा सोनं, आज थेट 71 हजारांच्या पुढे

Image

सोनं खातंय भाव! कधीकाळी 63 रुपयांत यायचं एक तोळा सोनं, आज थेट 71 हजारांच्या पुढे

Gold Price History in 1964: भारतात सोन्याला फार महत्त्व आहे. सोने या धातूचे दागिने करून ते परिधान करणे, हे भारतीय संस्कृतीत भुषणावह मानलं जातं. त्यामुळे लोक गुंतवणूक तसेच आभूषण म्हणून परिधान करण्यासाठी सोनं खरेदी करतात. आज भारतात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 71,743 रुपयांवर पोहोचला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, देशात कधीकाळी अशीही वेळ होती, जेव्हा सोन्याचा दर फक्त 100 रुपये होता 1964 या सालापासून सोन्याच्या दरात सातत्याने कित्येक पटीने वाढ झाल्याचं दिसतंय. Bankbazaar.com वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 1964 साली भारतात सोन्याचा दर फक्त 63.25 रुपये तोळा होता. तेव्हापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किमतीत वाढच झालेली आहे. 1964 सालचा सोन्याचा दर आणि सध्याचा सोन्याचा दर पाहून तुम्हाला हा फरक समजेल. 1964 सालापासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 1130 पटीने वाढ झालेली आहे. सगळ्या जगात सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय हा सर्वोत्तम मानला जातो. जेव्हा-जेव्हा जगात अस्थिरता निर्माण होते, तेव्हा-तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात. 1970 साली सोन्याचा दर 184 रुपये प्रतितोळा होता. 1980 साली हा दर 1330 रुपयांवर गेला, साल 1990 मध्ये हाच दर 3200 रुपयांपर्यंत वाढला. 2000 साली 4,400 रुपये तर हाच दर 2010 मध्ये थेट 18,500 रुपयांपर्यंत वाढला. 2020 साली सोन्याचा दर 48,651 रुपये प्रतितोळा होता. आता सोनं रुपये 71 हजारांच्याही पुढे गेलं आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!