HDFC Bank Credit Card Rule Change: HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना बसणार मोठा फटका, वाचा तुमच्या खिशावर काय परिणाम पडणार?

Image

थर्ड पार्टी अॅपवरून शैक्षणिक ट्रान्झिशन करण्यासाठी एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ट्रान्झिशनच्या 1 टक्के चार्जेस घेतले जाणार आहेत.

एचडीएफसीने आपल्या क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांत बदल केला आहे. बदललेले हे नियम येत्या 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे आता एचडीएफसी बँकेच्या ग्रहकांना मोठा आर्थिक फटका हा बसणार आहे. एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डच्या नव्या नियमांनुसार CRED, Cheq, MobiKwik, Freecharge अशा प्रकारच्या सेवा वापरणाऱ्या ग्राहकांच्या व्यव्हारावर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. यासाठी प्रति व्यव्हाराची मर्यादा आहे. ग्राहक आता 3000 रुपयांचे व्यव्हार एकावेळी करु शकणार आहेत. ( ) थर्ड पार्टी अॅपवरून शैक्षणिक ट्रान्झिशन करण्यासाठी एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ट्रान्झिशनच्या 1 टक्के चार्जेस घेतले जाणार आहेत. हे जार्जेस क्रेड, पे-टीएम, Cheq, मोबीकिवी, फ्रिचार्ज या तसेच इतर अॅप्सवर लागू असतील. ही ट्रान्झिशन फी 3000 रुपयांपर्यंत वाढू शकते. शाळा किंवा कॉलेजच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा त्यांच्या पीओएस मशीनवर जाऊन एचडीएफसीच्या मदतीने ट्रान्झिसन्स केल्यावर कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. जर तुम्ही 15 हजारांपेक्षा कमी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. जर तुम्ही 15000 पेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला 1 टक्के शुल्क द्यावे लागणार आहे. इंधनाच्या खरेदीवर तुम्हाला हे शुल्क द्यावे लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी व्यव्हार करत असाल तर तुम्हाला 50,000 पेक्षा कमी व्यव्हारांवर शुल्क भरावे लागणार नाही. पंरतु जर तु्म्ही 50,000 पेक्षा जास्त रुपयांचे व्यव्हार करत असाल तर तुम्हाला 1 टक्के शुल्क द्यावे लागेल. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विमा व्यव्हारावर शुल्क आकारले जाणार आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!