'Auron Mein Kahan Dum Tha' Release Date Postponed: कल्की 2898 AD चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'ओरो मे कहा दम था'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

Image

कल्की 2898 एडीच्या बॉक्स ऑफिस यशामुळे औरों में कहाँ दम थाचे रिलीज उशीर होणार असल्याची माहिती आहे. 2 ते 3 आठड्यांनंतर चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अजय देवगण आणि तब्बू यांचा ऑन स्क्रिन रोमांस त्यांच्या चाहत्यांना पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण, औरों में कहाँ दम था (AMKDT) ची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट 5 जुलै रोजी प्रदर्शीत होणार होता. मात्र, आता त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. प्रभास अभिनीत कल्की 2898 AD सध्या यशाच्या शिखरावर आहे. रविवारी चित्रपटाने फक्त भारतात 84 कोटींची कमाई केली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चार दिवसांत जगभरात 550 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे 'ओरो मे कहा दम था' चित्रपटाचे नुकसान होऊ नये यासाठी 'ओरो मे कहा दम था' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचा अंदाज बांधला जात आहे. EXCLUSIVE OVEN-FRESH NEWS: Even as I write this, there are serious discussions going on for the postponement of this week’s ‘Auron Mein Kahan Dum Tha’. The film might move ahead by 2-3 weeks. ‘Kalki 2898 AD’ is going super-strong so showcasing of every new film is gonna be a... — Komal Nahta (@KomalNahta)

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!