Beed Parli Firing : सरपंचाच्या हत्या प्रकरणी स्थानिकांचा आक्रमक पवित्रा; बबन गीतेंच्या अटकेसाठी जमावाचा थेट पोलीस स्टेशनला घेराव

Image

Beed Parli Firing : बीडच्या परळी येथील मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांचावर झालेल्या गोळीबाराच्या (Beed Firing) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गोळीबारा मध्ये करडखेलचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाल्यानंतर या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी असलेले बबन गीते यांना अटक करा, या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला आहे. परिणामी, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: परळीत उपस्थित राहून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र, आता या हत्येच्या घटनेला राजकीय वळण प्राप्त झाल्याने पोलीस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी याबाबत अधिक माहिती अशी की, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयित आरोपींनी बापूराव आंधळे आणि ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली.बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. मात्र अद्याप यातील मारेकरी फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. इतर महत्वाच्या बातम्याBeed Parli Firing : परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; पैशांच्या वादातून सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय Bhandara News : लग्न समारंभासाठी निघालेल्या माय लेकावर काळाचा घाला; भरधाव कार अनियंत्रित झाल्याने दोघांचा दुर्देवी मृत्यू

Beed Parli Firing : बीड च्या परळी येथील मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांचावर झालेल्या गोळीबाराच्या (Beed Firing) घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे गोळीबारा मध्ये करडखेलचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाल्यानंतर या मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी असलेले बबन गीते यांना अटक करा, या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला आहे. परिणामी, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: परळीत उपस्थित राहून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र, आता या हत्येच्या घटनेला राजकीय वळण प्राप्त झाल्याने पोलीस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी याबाबत अधिक माहिती अशी की, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयित आरोपींनी बापूराव आंधळे आणि ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. मात्र अद्याप यातील मारेकरी फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. इतर महत्वाच्या बातम्या Beed Parli Firing : परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; पैशांच्या वादातून सरपंचाच्या हत्येचा कट रचल्याचा संशय Bhandara News : लग्न समारंभासाठी निघालेल्या माय लेकावर काळाचा घाला; भरधाव कार अनियंत्रित झाल्याने दोघांचा दुर्देवी मृत्यू

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!