नीता अंबानींना भिडली ईशाची सासूबाई, शास्त्रज्ञ असूनही लालभडक ड्रेस व भडक टिकलीमध्ये राखली भारतीय संस्कृती आठवण

Image

Amabni कुटुंबात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या शुभ प्रसंगच्या मुहूर्तावर पूजाअर्चाही केल्या जात आहेत. नवरदेव अनंत अंबानीची बहीण ईशा अंबानी, तिच्या सासू-सासऱ्यांसह मुंबईच्या कृष्णा काली मंदिरात पूजा करण्यासाठी पोहोचली. या वेळी सासू स्वाती पिरामल यांचा साधेपणा सर्वांनाच खूप आवडला.आपल्या साधेपणाने त्यांनी त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या नीता अंबानी यांनाही मागे टाकले. नीता अंबानी त्यांच्या ब्युटी आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. लाखोंच्या साड्या, करोडोंचे दागिने घातलेल्या नीतांवरून कोणाचीच नजर हटत नाही. परंतु स्वाती पिरामल या सायंटिस्ट असूनही त्यांची साधी आणि मनमोहक स्टाइल यावेळी भाव खाऊन गेली आणि त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. (फोटो सौजन्य :- योगेन शहा)

Swati Piramal Red Dress Look : नीता अंबानी अनेकदा आपल्या अस्मानी सौंदर्यासोबतच गडगंज श्रीमंतीसाठी चर्चेत असतात. पण, ईशा अंबानीच्या सासूबाईही नीता यांच्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. त्यांच्याकडे साक्षात माता लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही वास करतात. अलीकडेच सायंटिस्ट व बिझनेसवुमन असलेल्या स्वाती पिरामल यांच्या साध्या सिंपल लूकने चक्क नीता अंबानींनाच टक्कर दिली आहे. बघा फोटोज.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!