ईशा अंबानीचा साधेपणा सगळ्यांवरच पडला भारी, पण सासू सून वेगळ्या गाडीतून का आल्या? चाहत्यांना पडला प्रश्न

Image

अंबानी परिवाराची लाडकी लेक ईशा अंबानी तिच्या साधेपाणामुळे सर्वांनाच आवडते. सध्या अंबानी परिवारात लग्नाची तयारी पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमधील लूक समोर येत आहेत. अशात ईशा अंबानी तिच्या भावाच्या लग्नापूर्वी पती आनंद पिरामल आणि सासरच्या मंडळींसोबत काली मंदिरात पूजा करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्या साध्या लुकने चाहत्यांच्या मनात जागा निर्मण केली. यावेळी ईशा तिच्या आलिशान 'बेंटले' कारमधून पूजेसाठी मंदिरात पोहोचताना दिसली. तिचा नो मेकअप लुक सर्वांनाच खूप आवडला पण यावेळी ईशाची सासू स्वाती पिरामल वेगळ्या गाडीतून येताना दिसल्या. यावेळी तिच्या सासूचा साधेपणा पाहून ही तर या तर आपल्यासारख्याच आहेत असे देखील अनेकांना वाटले. ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)

Isha Ambani pink suit: अंबानी परिवारात लग्नातचे वारे वाहू लागले आहेत. या लग्नाच्या आधी अनेक सोहळे साजरे होत आहेत. अशात ईशा अंबानी एका सामाजिक कार्यासाठी नवी मुंबईतील नेरूळ येथील 'कृष्ण काली मंदिर'मध्ये दिसली. उद्योगपती भरत जे मेहरा यांनी Kali temple Navi Mumbai येथे भेट दिली. एका अलिशान गाडीमधून ती बाहेर आली पण तिचा साधेपणा चाहत्यांच्या मनात घर करून गेला.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!